अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये गोळीबार, 11 जण ठार
अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात 11 जण ठार झाले असून 5 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सिटी ऑफ व्हर्जिनिया बीच येथील महापालिकेच्या इमारतीत ही हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला आहे. जखमींना येथील व्हर्जिनिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
व्हर्जिनिया बीचच्या इतिहासात हा सर्वात वाईट दिवस असल्याचे महापौर बॉबी डायर यांनी म्हटले आहे. तसेच या हल्ल्यात ठार झालेले सर्वजण आमचे मित्र, शेजारी व महापालिकेचे कर्मचारी होते.असेही त्यांनी म्हटले आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.