ताजी बातमी

सोलापूरच्या विद्यापीठ प्रवेशद्वारावर अॅसिडयुक्त बॅटऱ्यांनी भरलेल्या ट्रकवर प्रवासी बस आदळून गंभीर अपघात घडला. बस ट्रकला जाऊन धडकल्याने बॅटऱ्या फुटल्या त्याचे अॅसिड बसवर उडाले. या अॅसिडने आग धरल्याने बसने पेट घेतला. त्यामुळे बसमधील १३ जण होरपळले. स्थानिक युवकांनी बसची काच फोडून प्रवाशांना वाचवले.

कर्नाटकमधून बॅटऱ्या घेऊन निघालेला ट्रक विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ थांबला होता. शुक्रवारी पहाटे वाजेच्या सुमारास तेलंगण परिवहन महामंडळाची बस हैदराबादहूहन पुण्याकडे निघाली होती. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बसने ट्रकला धडक दिली. त्यामुळे ट्रकमधील बॅटऱ्यांचा स्फोट झाला. त्यातील अॅसिड बसवर आदळल्याने बसनेही पेट घेतला. काही क्षणांतच आगीने चहुबाजूंनी बसला वेढा घातला. त्यामुळे आतील १५-१६ प्रवाशांना बाहेर पडणे कठीण झाले. या भागातील काही युवक व्यायामासाठी निघाले होते. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन बसची काच फोडूून प्रवाशांना बाहेर काढले. यात १३ प्रवासी जखमी झाले असून वाहक गंभीर जखमी आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात