देशाच्या जडणघडणीमध्ये भूमिका बजावलेल्या व्यक्तींचा इतिहास समजून घेतला पाहिजे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जन्मशताब्दीनिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम बापू पाटील, डॉ. रफीक झकेरिया यांचा विधानमंडळात गौरव
देशाचे स्वातंत्र्य पुढे नेण्यामध्ये, महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मोठ्या व्यक्तींचा इतिहास सर्वांनीच समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्याच्या विधानमंडळाने हा इतिहास माहिती असलेल्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, पत्रकार आदी जाणकारांना आमंत्रित करुन विधानमंडळाच्या सदस्यांसाठी व्याख्यानाचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.