कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किराणा दुकानदार देणार घरपोच सेवा - नागपूर महापालिका आयुक्तांचा उपक्रम
नागपूर महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी व्यवस्था
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू असली तरी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नातून नागपूर शहरात घरपोच किराणा मिळण्याची व्यवस्था झाली आहे. फोन करा आणि किराणा घरपोच मिळवा, अशी ही व्यवस्था आहे. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या दहाही झोनमधील सुमारे ४५ दुकानदारांनी ही व्यवस्था केली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.