ताजी बातमी


प्रती,

मा.उद्धवजी ठाकरे साहेब

 

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई- 



प्रती,


मा.अजितदादा पवार साहेब 



विषय : महाराष्ट्राची लोककला व लोकपरंपरा जिवंत ठेवणा-या कलावंत व त्यांचे सहकारी यांना उपजिवकेसाठी किमान आर्थिक मदत करण्याबाबत.(शिंदेशाही परिवार)गायक आनंद प्रल्हाद शिंदे

महोदय, 

वरील विषयांकित, मी आनंद प्रल्हाद शिंदे (संस्थापक/सेक्रेटरी - प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट ) सदर निवेदनामार्फत आपणांस विनंती आहे की,  आज जगात देशात व राज्यात कोरोना व्हायरस या विषाणू जन्य आजारांने थैमान घातले आहे.  जगातील प्रगतशील  अशा अमेरीका,इटली,चिन अशा अनेक देश या आजाराशी लढत आहे. आपल्या देशात व राज्यात ही या आजाराने आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब हे एका संयमी व अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत् तसेच जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सद्य परिस्थिती बाबत माहिती देत सरकारी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करत आहे.  मा.मुख्यमंत्री यांनी दि २० मार्च रोजी ३१ मार्च पर्यंत लाॅकडाऊन ठेवण्याचा आदेश दिला . देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २१ दिवस देश लाॅकडाऊन ठेवण्याचा आदेश दिला आहे . केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे समजुन माझ्या सारखे असंख्य मराठी कलावंत घरात राहुन सरकारच्या आदेशाचे व सूचनांचे पालन करत सरकारच्या प्रत्येक आवाहानाला सहकार्य करीत आहे. 

 महाराष्ट्राला लोककलेचा व परंपरेचा इतिहास आहे. लावणी , भारूड , वग , लोकसंगित, तमाशा, जागरण गोंधळ व ढोल लेझीम ,बॅन्जो पथक अशा कित्येक प्रकारतुन हे कलाकार आपली लोककला सादर करून आपला उदरनिर्वाह करित असतात. चैत्र महिनापासुन महाराष्ट्रातील अनेक गावाच्या जत्रा व यात्रांना सुरवात होत असते . शिवजयंती , आंबेडकर जयंती ,लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रमात या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते व यातुन मिळणा-या मानधावर यांचा कुटुबांचा उदरनिर्वाह चालतो . गर्दी आणि कार्यक्रम टाळण्याचा आदेश  सरकारने दिल्याने यात्रा, जत्रेमध्ये मनोरंजनात्मक न  ठेवता यात्रा करण्यावर गावकारभार्‍यांचा भर आहे. त्यामुळे त्यांंच्याकडून या कार्यक्रमाचे केलेले बुकिंगही रद्द केले जात आहे. आज महाराष्ट्रात ४० हजाराच्या जवळपास लोककलावंत आहे. कोरोना व्हायरस मुळे शासनाने लाॅकडाऊन चा आदेश दिला त्यामुळे आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करणा-या या हातावर पोट असणा-या या कलाकारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  शासनाने सांगितलं आहे की , अन्न धान्य परिमंडळ विभाग यांच्या वतीने रेशनकार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून देण्यात येईल पण माझा हा कलावंत बांधव हा महाराष्ट्रभर फिरून आपली कला सादर करत असल्याने त्याच्याकडे रेशनकार्ड संबंधित कोणतेही कागदपत्रे नाही आहे . मग तो शासनाच्या वतीने देण्यात येणा-या अन्न धान्याचा लाभ कसा घेऊ शकेल.  स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट च्यामाध्यमातून मा.मुख्यमंत्री  उदधवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना माझी विनंती आहे की , महाराष्ट्रभर फिरून आपली कला सादर करणा-या या सर्व माझ्या सहकारी कलावंत बांधव व सहकारी कर्मचारी यांना किमान आर्थिक मदत शासनाच्या वतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी विनंती मा.मुख्यमंत्री उदधवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना करण्यात येत आहे. 

                        आपला विश्वासु 

 (सेक्रेटरी )श्री.आनंद प्रल्हाद शिंदे

                अध्यक्ष- डॉ उत्कर्ष आ शिंदे ,

                उपाद्यक्ष -श्री .आदर्श आ शिंदे 

          (स्व. प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट .)

(कलाकाराची नाव पत्ता व खातेनंबर यांची माहिती राज्य शासनाला उपलब्ध करून देण्यात येईल .)

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात