ताजी बातमी

खाद्यपदार्थ बनवणाऱ्या  व पोहोचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता ठेवा. अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातल्या मासळीच्या विक्रीवर कोणतेही बंधन नाही. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्रीकर आणि खरेदीदार असे दोघांनीही ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे. नागरिकांना जीवनावश्यक पदार्थ खरेदी करता येतील. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र, ऊसतोड मजुरांच्या जेवणाची काळजी संबंधित कारखान्यांच्या व्यवस्थापनांना घ्यावी लागणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात