ताजी बातमी

कुंभार  व्यावसायिकांची भविष्यातील होणारी उपासमार टाळावी यासाठी कुंभार व्यवसाय करणाऱ्यांना टाळे बंदीत काम करण्याचे आदेश काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

कुंभार समाज प्राचीन काळापासून मातीपासून मूर्ती, भांडी, विटा तयार करण्याचे काम करीत आहे. या पारंपरिक व्यवसायावरच समाजाचे जीवन अवलंबून आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक तालुक्यात 2 हजाराहून अधिक संख्येने हा समाज जिल्ह्यात निवास करून आहे. दिवाळीत पणत्या, मुर्त्या तयार करून या समाजाच्या कामाला सुरुवात होते. यानंतर फेब्रुवारी अखेरीपासून ते मे पर्यंत गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखले जाणारे  माठ, घागर, रांजण,नांद,विविध मुर्ती जालना,सेलु,मंठा,आष्टी,तयार केले जाते आणि मार्च महिन्याच्या अखेरीस विक्रीला सुरुवात होते. मात्र यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस देशभरात लॉकडाउन जाहीर झाले त्यामुळे उन्हाळ्यात गरिबांचे फ्रिज  म्हणून ओळखल्या जाणारे माठ, सूरई सह ईतर वस्तूची विक्री ठप्प झाली. मार्च ते मे या चार महिन्याच्या कालावधीतच कुंभार समाजाचे पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन असते ते सुध्दा कोलमडून पडले. त्यामुळे भविष्यात उपासमार होऊ नये म्हणून माठ व इतर वस्तूची विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात