कोरोनाच्या कठीण काळात व या महायुद्धात राज्य सरकारचे हात मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे साहेब व राज्याचा आरोग्य राज्यमंत्री या नात्याने नागरिकांना मदतीचे व सहकार्याचे आवाहन केले होते: आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
आज या आवाहनाला प्रतिसाद देत हसूर येथील युवकांनी संस्थेतर्फे २० किलोमीटर सायकलने प्रवास करून निधीचा धनादेश माझ्याकडे सुपूर्द केला.
तसेच ए.पी. पाटील सर्वोदय पत संस्थेतर्फे २५ हजार रुपये, सर्वोदय महिला पत संस्थेतर्फे ५ हजार रुपये, जयभीम दूध संस्थेतर्फे ५ हजार रुपये तसेच या सर्व संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व सभासद यांच्यातर्फे एकूण ३५ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीसाठी धनादेशाच्या स्वरूपात देण्यात आले
याप्रसंगी सर्व संस्थेचे असिस्टंट मॅनेजर श्री. अभिजीत पाटील व संस्थेचे सभासद श्री. सुशांत भंडे, श्री. प्रेमचंद पाटील, श्री. राहुल पाटील युवक मित्र व इतर मान्यवर उपस्थित होते.