ताजी बातमी

मुंबई दिनांक १८: सैयदना बुरहानी ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे तर एडल वाइज कंपनी तर्फे ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.


अनेक हातांनी झालेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत २५१ कोटी रुपये जमा झाले आहेत.


दाऊदी बोहरा समाजाच्यावतीने देशभरात विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आतापर्यंत ८ लाख ३३ हजार २४३ लोकांना त्याचा लाभ झाला असल्याचेही ट्रस्टच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करतांना सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोना विषाणुच्या संकटावर नक्कीच मात करू असा विश्वास  पुन्हा एकदा  व्यक्त केला आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात