ताजी बातमी

ससून रुग्णालयाच्या नवीन ११ मजली इमारतीची उर्वरित कामं तातडीनं पूर्ण होण्यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल. जिल्हा नियोजन समितीमधून २५ टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनानं यापूर्वीच दिले आहेत. पुणे पोलिसांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेच्या दृष्टीनं मोबाईल व्हॅनद्वारे तपासणीवर भर द्यावा. N-95 मास्क व आवश्यक ती साधनं उपलब्ध करून द्यावीत. शहर-ग्रामीण भागातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावेत. शासनासह स्वयंसेवी संस्थांचं सहकार्य घ्यावं. रेशन दुकानांद्वारे धान्य वितरित करावं. शैक्षणिकदृष्टया विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी प्राचार्यांना संस्थेत उपस्थित राहण्यासाठी परवानगी देणं आवश्यक आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसंच COVID -19 सेवा देणाऱ्या खाजगी रुग्णालयांना शासनाकडून मदत उपलब्ध करून देणं, याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात येईल. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मार्केट कमिट्या, सहकारी संस्थांनी देखील पुढे यावं आणि आर्थिक मदतीचा हात द्यावा, असं आवाहन करतो.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात