आयुषने गेले वर्षभर स्वत: बचत केलेली रक्कम रु. २,३७८ मुख्यमंत्री सहायता निधी ( कोविड - १९ ) साठी देणगी स्वरूपात दिली.
आयुष नावाचे सार्थक व्हावे
आयुषचा - दुसरा वाढदिवस शनिवार दि. ९ मे २०२० रोजी होता. परंतु सध्याच्या करोना महाआपत्तीमुळे अभिजीत व तेजल या उभयतांनी आयुषचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या ऐवजी आयुषने गेले वर्षभर स्वत: बचत केलेली रक्कम रु. २,३७८ . ०० मुख्यमंत्री सहायता निधी ( कोविड - १९ ) साठी देणगी स्वरूपात दिली.
हा काही फार मोठा निधी नाही आणि आपण काही फार मोठं कार्य करतोयं, असं निरागस आयुषला अजिबात वाटत नाही. कारण ती ' समज ' सुद्धा त्याला अजून आलेली नाही. पण ज्या वेळी ती समज येईल त्या वेळी त्याला अवर्णनीय आनंद प्राप्त होईल, अशी आकांक्षा त्याच्या मम्मी-पप्पांची आहे. त्याही पलिकडलं म्हणजे आयुषचा हा आदर्श कित्ता इतरांनी गिरवावा आणि करोना महायुद्धात आपल्या आयुष्यातील अल्पसा वाटा द्यावा म्हणजे त्याच्या आयुष नावाचे सार्थक समाधान झाल्याचे मिळेल.