ताजी बातमी

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ४१९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ नमुन्यांपैकी २ लाख १५ हजार ९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२ हजार १७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४४ हजार ३२७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात