महाराष्ट्र राज्यस्तरीय ऑनलाईन काता चॅम्पियन्स शिप 2020
महाराष्ट्र राज्यस्तरीय ऑनलाईन काता चॅम्पियन्स शिप 2020
कराटे चा सराव सक्रिय ठेवण्यासाठी युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया ने राज्यस्तरीय ऑनलाईन काता चॅम्पियन शिप स्पर्धा दि. 20 ते 25 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड, पेण, आणि नाशिक या ठिकान्या वरून 376 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांनी आपल्या घरी राहून काता चा व्हिडिओ असोसिएशन ला पाठविला. त्यामुळे या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी पंचांनी घरी राहून झूम एप् द्वारे सदर स्पर्धेचा निकाल दिला.
या स्पर्धेत रायगड पनवेल मधून ब्लॅक बेल्ट स्पर्धक कुमारी समिक्षा दिपक कायंदेकर, कुमार ओमकार केंडे आणि कुमार वेदांत कायंदेकर या तिघांना सुवर्णपदक प्राप्त झाले.
तसेच 7/8/9 या वय गटात आराध्य जाधव ला सुवर्णपदक व स्वरूपा चोरघे ला रजत पदक मिळाले. तसेच 10/11/12 या वय गटात आर्यन सोनटके ला सुवर्ण पदक, ओमकार चोरघे ला रजत पदक आणि अन्वेष मांडे ला कांस्य पदक त्याचप्रमाणे 13/14/15 या वय गटात भावेश मते ला कांस्य पदक प्राप्त झाले.
या सर्व खेळाडूंना युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन संस्थेचे मार्गदर्शक, अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर सर यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले.