ताजी बातमी

कोरोना संकट काळात एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्याच्या हद्दीत जाण्यासाठी शासनाकडून जारी होणारे ई-पास हुबेहुब बनवणाºया टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ही उत्तम कारवाई मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३ चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने केली. अटक करण्यात आलेल्या ३ आरोपींचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे तर एक जण कॉम्प्यूटर-टायपिंग क्लास चालक आहे. या आरोपींना मालवण व वसई परिसरात अटक करण्यात आली असून, या आरोपींनी मोठ्या प्रमाणात बोगस ई-पास नागरिकांना देऊन शासनाची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

    कोरोना संकटात सध्या बिगनिंग - २ च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोरोनासोबत जगताना शासनाने काही नियम व अटी अद्यापही कायम ठेवल्या आहेत. त्यापैकी एक आहे ई-पास! या ई-पासचा काळाबाजर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पास बनवून देणाºयाशी संपर्क साधला. विनाकागदपत्रे त्या इसमाने २ हजार रुपयांच्या मोबदल्यात व्हॉट्सअ‍ॅपवर ई-पास पाठवला. सदर बोगस ई-पास हुबेहुब शासनाकडून जारी करण्यात आलेल्या पासप्रमाणे होता. त्यावर मुंबई पोलीस आयुक्त व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असे नमूद असून, पासची वैधता दि. ११ ते २२ जुलै अशी नमूद होती.

   या प्रकरणी २४ जुलै रोजी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ११२/२०२०) भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७Þ, ३४ सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क), ६६(ड) नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पोलिसांची २ पथके तयार करण्यात आली. या पथकांनी २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून तिघांना तर पालघर जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे अब्दुल करीम मोहम्मद शेख ऊ र्फ अस्लम (३५, रा. मालवण), समीर शमशुद्दीन शेख (३६, रा. मुंबई), नूर मोहम्मद गण शेख(३९, रा. मुंबई, तिघेही ट्रॅव्हल्स व्यवसायिक), विनय मोहन पाटे (३६, धंदा. कॉम्प्यूटर-टायपिंग क्लास चालक, रा. वसई, पालघर) अशी सांगितली. सदर बोगस पास विनय पाटे याने फोटो शॉप, क्यू आर स्कॅनर या सॉफ्टवेअरचा वापर करून तयार केले होते. यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल प्फोन व स्कॅन पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

   बोगस ई-पास तयार करणाºया टोळीचा पर्दाफाश सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप कर्णिक, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त नंदकुमार ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्य) राजेंद्र चिखले, गुन्हे शाखा कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन भारती, पोलीस उपनिरीक्षक मोहसिन पठाण, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ उघडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश गावित, हवालदार विकास जाधव, अशोक राणे, पोलीस नाईक आकाश मांगले, संजय नागवेकर, दीपक कोळी, मंगेश पवार, पोलीस शिपाई भास्कर गायकवाड, राहुल अनभुले, प्रमोद सकपाळ, पोलीस शिपाई चालक तांबेड आदी पथकाने केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात