कल्याण – डोंबिवली येथे कोविड समर्पित काळजी केंद्र, चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोरोना संकटात महाराष्ट्र शासन खंबीर आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या.