नेहरू नगर येथील श्री गणेशोत्सव मंडळा तर्फे कोरोना योध्यांचा सत्कार
कोरोनाच्या काळात मानवावर आलेले हे खुपच मोठे संकट आहे,एकप्रकारे युद्धच म्हणा ना ते! या संकट काळात या युद्धात सैनिक म्हणून आपलं कर्तव्य पार पडणारे कोण असतील तर ते आहेत डॉक्टर, परिचरिका, आरोग्य कर्मचारी, मनपा सफाई कर्मचारी, होमगार्ड,दत्तकवस्ती कर्मचारी, आणि या सर्वांचे रक्षण करणारे पोलीस, म्हणजेच आजच्या या कोरोनाच्या महाभयंकर अशा युद्धभूमीवर लढणारे ‘कोरोना योद्धे’ होय.
अशाच या कोरोना योध्याना आपले कर्तव्य बजावत असताना बळ, प्रेरणा मिळावी म्हणून कुर्ला नेहरु नगर येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ दक्षिणच्या वतीने नेहरु नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्या सह पोलिस निरीक्षक राम दिवेकर, पोलिस निरीक्षक सतिश थोरात,डॉ.कुलदिप जाधव, डॉ.संकेत देवळेेेकर,फार्मसिस्ट प्रज्ञा इंगळे,पोस्टल असिस्टंट दर्शना निकम आदि मान्यवरांच्या सन्मान शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले की आज घडीला कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीत कोरोना योद्धे बनून अनेक जण आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रीय कर्तव्ये बजावत आहेत, अशा कोरोना योध्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.आपण सर्वजण मिळून या कोरोनाच्या युद्धाचा सामना करायचा आहे, यावेळी नागरिकांना मदत व सहकार्य करण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण ती पार पडणार आहोत व हे युद्ध आपण सगळे जिंकणार आहोत.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रोहन पाटील,सचिव सतिश कवाडे, खजिनदार करण परदेेेशी, गितेेश मानेे आदि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.