ताजी बातमी

मुंबई उपनगर | मालवणी-अंबोजवाडी परिसरातील शासकीय जमीन आणि कांदळवन क्षेत्राजवळ झालेल्या मोठ्या अतिक्रमणाविरुद्ध जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत सुमारे १०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. या मोहिमेदरम्यान अंदाजे २८० झोपड्या तसेच काही पक्क्या बांधकामांचे निष्कासन करण्यात आले.

शासकीय जमिनीवर मोफत पुनर्वसन मिळण्याच्या आशेने वाढत असलेल्या अतिक्रमणाकडे येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सीईओ डॉ. महेंद्र कल्याणकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली.

अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) श्री. गणेश मिसाळ आणि प्रभारी उपजिल्हाधिकारी श्री. विनायक पाडवी यांच्या नेतृत्वाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका व मालवणी पोलिसांच्या सहकार्याने ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी ही मोहीम पार पडली. या कारवाईत अली तलाव परिसरातील अतिक्रमण हटवून तलाव क्षेत्रही मुक्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, यापुढील अतिक्रमणांवर कारवाई अधिक प्रभावी होण्यासाठी प्रशासनाने प्रथमच सॅटेलाईट छायाचित्रांचा वापर करून २०११ नंतर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची पडताळणी केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात