ताजी बातमी

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांना वेगाने निराकरण मिळावे यासाठी आज आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांनी फोर्ट येथील बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली.

या बैठकीत मा. आयुक्त भूषण गगराणी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विभागातील रस्त्यांच्या दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, स्वच्छता व्यवस्थेतील उणीवा, तसेच धारावीतील ९० फूट रस्त्याच्या दुरुस्ती व स्वच्छतेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी विविध प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

या प्रसंगी मा. नगरसेवक रवी राजा, भाजपा मुंबई कार्यकारिणी सदस्य मुरगन सेलवम, भाजपा जिल्हा सरचिटणीस अभिषेक सावंत यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांनी स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करत, नागरिक-केंद्रित कामांना प्राधान्य दिल्याचे या बैठकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात