देवगडमध्ये शासकीय मत्स्य विद्यालय स्थापनाची गती — मुंबई मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
मंत्रालय, मुंबई येथे देवगड तालुक्यात शासकीय मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नीतेशजी राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत देवगडमध्ये दापोली कृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय उभारण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
राज्यातील विद्यार्थ्यांना मत्स्यविषयक उच्च दर्जाचे शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बैठकीत नमूद झाले. या संस्थेमुळे मत्स्यउत्पादन वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मत्स्य संशोधनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
बैठकीस पदूमचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त किशोर तावडे, तसेच कृषी व मत्स्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.