ताजी बातमी

 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबई कार्यालयात समुपदेशन, प्रशासन आणि इतर सर्व विभागांची सविस्तर आढावा बैठक आज पार पडली. राज्यभरात बुवाबाजी, भोंदूगिरी, अनिष्ट प्रथा आणि चुकीच्या समजुतींच्या आडून महिलांची तसेच कुटुंबांची होत असलेली फसवणूक गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेला बळकटी देण्याच्या उद्देशाने आयोगाने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भात विस्तृत चर्चा घेण्यात आली.

आयोगातर्फे सोमवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील वनामती सभागृहात “सक्षमा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सुरक्षेबाबत जनजागृती वाढविणे आणि कायदेशीर संरक्षणाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत व्यापकपणे पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.

कार्यक्रमात खालील विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे:

  • भारतीय न्याय संहितेत महिला सुरक्षेसाठी करण्यात आलेले महत्त्वपूर्ण बदल
  • कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पॉश’ (PoSH) कायद्याची अंमलबजावणी आणि त्यातील तरतुदी
  • सायबर गुन्हे, ऑनलाइन सुरक्षितता आणि डिजिटल स्पेसमध्ये महिलांनी घ्यावयाची काळजी

या कार्यक्रमाची रूपरेषा, आयोजनामधील समन्वय, सहभागींसाठी सुविधा आणि प्रचार-प्रसार याबाबत महिला आयोगाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना बैठकीत देण्यात आल्या.

महिला सबलीकरण, संरक्षण आणि अंधश्रद्धामुक्त समाजनिर्मितीच्या दिशेने आयोगाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात