माजिवडा येथे अत्याधुनिक हिंदू स्मशानभूमीचे लोकार्पण; पर्यावरणपूरक सुविधांसह सेवांची नवी पातळी
माजिवडा गांव येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक हिंदू स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले. आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या स्मशानभूमीमुळे नागरिकांना स्वच्छ, सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक वातावरणात अंत्यविधी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
स्मशानभूमीत सीएनजी / एलपीजी गॅस दाहिनी मशीन बसविण्यात आली असून, त्यासोबत ‘स्मोक न्यूसन्स अबेटमेन्ट सिस्टीम’ म्हणजेच धुराचा उपद्रव कमी करणारी विशेष यंत्रणादेखील बसविण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे अग्निसंस्कारानंतर प्रदूषण होत नाही आणि तब्बल ८० टक्के वायू प्रदूषण कमी करण्यात मोठी मदत होते.
याशिवाय स्मशानभूमी परिसरात खालील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत—
- संरक्षक भिंत व आकर्षक प्रवेशद्वार
- अंत्यविधीसाठी येणाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
- अंत्यविधी हॉल व प्रार्थना हॉल
- श्री शंकर मंदिर
- गार्डन व लॅन्डस्केपिंग
- परिसरातील प्रकाशव्यवस्था व पाण्याची सुविधा
- स्वच्छतागृह
- पार्किंगची व्यवस्था
- पेव्हर ब्लॉकद्वारे सुशोभित परिसर
- नातेवाईकांसाठी आंघोळीची सोय
- सोलार दिवे व सोलार बंब
या अत्याधुनिक आणि पर्यावरण-स्नेही सुविधांमुळे माजिवडा परिसरातील नागरिकांना दर्जेदार सेवा मिळणार असून स्मशानभूमीचे आधुनिकीकरण हा एक आदर्श उपक्रम ठरणार आहे.