ताजी बातमी

महाराष्ट्रातील वीज वहन व्यवस्था अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड (महानिर्मिती) यांच्यात ७६५ के.व्ही. क्षमतेच्या वीज पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

हा करार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या अत्याधुनिक ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पामुळे राज्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यास मोठी मदत होणार असून, वीज वहनातील अडथळे कमी होऊन औद्योगिक, कृषी तसेच घरगुती ग्राहकांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित होणार आहे. तसेच भविष्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमधून निर्मित होणारी वीज प्रभावीपणे राज्यभर पोहोचविण्यास हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

महापारेषण आणि महानिर्मिती यांच्यातील या सहकार्यामुळे राज्याची ऊर्जा पायाभूत सुविधा अधिक बळकट होऊन महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल टाकले गेले असल्याचे मानले जात आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात