मेट्रो लाईन ७ अच्या कामामुळे एस विभागात ४ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा; वेळापत्रकात बदल
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिमी व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीच्या छेद–जोडणी (क्रॉस कनेक्शन) चे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.
हे काम सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीनंतर १ वाजेपर्यंत (एकूण ८७ तास) सुरू राहणार आहे. या कालावधीत एस विभागातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतही बदल होणार आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
एस विभागातील बाधित भाग व बदललेला पाणीपुरवठ्याचा वेळ
भांडुप पश्चिम – क्वारी मार्ग, टेंभी पाडा, कोकण नगर, समर्थ नगर, भट्टी पाडा, उत्कर्ष नगर, श्रीरामपाडा, त्रिमूर्ती नगर, वाघोबावाडी, तानाजीवाडी, राम नगर, शिवाजी नगर
⏰ पाणीपुरवठा वेळ: पहाटे ५ ते सकाळी १०
खिंडीपाडा
⏰ पाणीपुरवठा वेळ: २४ तास
विक्रोळी पश्चिम
⏰ पाणीपुरवठा वेळ: सकाळी ११.३० ते रात्री १०.३०
साई हिल, साकी विहार पंपिंग सप्लाय
⏰ पाणीपुरवठा वेळ: रात्री ८ ते रात्री १०.३०
रमाबाई नगर पंपिंग सप्लाय
⏰ पाणीपुरवठा वेळ: सायंकाळी ४.१५ ते रात्री ८
हनुमान नगर, फुले नगर पंपिंग सप्लाय
⏰ पाणीपुरवठा वेळ: मध्यरात्री ३.३० ते दुपारी ११.३०
महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
एस विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाण्याचा वापर करावा. तसेच पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी या काळात महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.