ताजी बातमी

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७५ मध्ये अपक्ष उमेदवार समिक्षा प्रतिक मोहिते या लोकहिताच्या मुद्द्यांवर आधारित स्वच्छ, प्रामाणिक आणि निर्भीड राजकारणामुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

“पक्ष नाही, पण जनतेसोबत ठाम” हा संदेश देत समिक्षा मोहिते यांनी प्रचारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, महिलांची सुरक्षितता, युवक रोजगार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर त्या थेट जनतेशी संवाद साधत आहेत.

विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाशिवाय, अपक्ष म्हणून जनतेचा विश्वास हाच आपला पक्ष मानून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. “चिन्ह बदलतात, माणसं नाही” या त्यांच्या ठाम भूमिकेमुळे सामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक महिला, युवक आणि कष्टकरी वर्गातून समिक्षा मोहिते यांना मोठा पाठिंबा मिळत असून, “कामातून विश्वास” हीच त्यांची खरी ओळख बनत आहे. शिक्षणाने सक्षम, विचारांनी प्रगल्भ आणि कृतीतून लोकहित साधणारी नेतृत्वशैली प्रभागातील मतदारांना भावत आहे.

“अपक्ष म्हणजे विश्वास, एक मत बदलासाठी” हा संदेश देत त्या मतदारांना लोकशाही बळकट करण्याचे आवाहन करत आहेत.

प्रभाग १७५ मध्ये यावेळी लोकहितासाठी उभा राहिलेला खरा पर्याय म्हणून समिक्षा प्रतिक मोहिते यांच्याकडे पाहिले जात आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात