वांद्र्यात शिवसेना उमेदवारावर चाकूने हल्ला सार्वजनिक सभेत घडले थरारक घटनेने खळबळ
मुंबईतील बांद्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ९२ येथून शिवसेनेचे उमेदवार सलीम कुरैशी यांच्यावर सार्वजनिक सभेदरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे.
या हल्ल्यात सलीम कुरैशी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती लक्षपूर्वक तपासली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत