ताजी बातमी

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या महिला आघाडीत सायन परिसरासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत सरिता इंद्रमोहन पांडे यांची महिला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमुळे सायनमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिलांच्या सशक्त सहभागाला नवे बळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

सायन परिसरात सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या सरिता पांडे यांनी स्थानिक स्तरावर विविध उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांच्या हक्कांसाठी लढा, स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग यामुळे त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अधिक सक्षम, सशक्त आणि प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. संघटनात्मक बळकटीसह महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

सरिता इंद्रमोहन पांडे यांना पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! ????????

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात