ताजी बातमी

माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार एम जे अकबर यांच्यावर #MeToo मोहिमेंतर्गत लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अकबर यांना चांगलाच झटका दिला आहे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमानी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता... दिल्ली न्यायालयानं अकबर यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. 

एम. जे. अकबर १९८९ मध्ये राजकारणात आले होते. त्याआधी ६७ वर्षीय एम. जे. अकबर यांनी 'एशियन एज' या इंग्रजी वृत्तपत्राचे माजी संपादक पद भुषविले होते. त्याचवरोबर, दैनिक 'द टेलिग्राफ' आणि 'संडे' नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले होते. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदारही झाले. २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेलेले एम. जे. अकबर जुलै २०१६मध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री झाले. पण #MeToo मोहिमेंतर्गत केलेल्या आरोपांमुळे एमजे अकबर यांना आपल्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात