ताजी बातमी

धारावीतील सोशलनगर भागात घरगुती वापरासाठी बेस्टची वीज चोरणाऱ्या १७ जणांविरोधात धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेस्ट अधिकाऱ्यांनी मंगळवारी इथल्या सर्किट बॉक्सची पाहणी केली असता, त्यातून अवैधरीत्या वायर दिसली. त्याचा तपास केला असता वस्तीतील १४ झोपड्यांमध्ये या वायरच्या मदतीने विविध उपकरणांचा वापर सुरू होता. ही वीजचोरी सकृतदर्शनी सुमारे पावणे दोन लाख युनिट आणि सुमारे ३२ लाख रुपये मूल्याची असल्याचे समजते.

बेस्टच्या विद्युत उपक्रमातर्फे बेकायदा, अवैध वीजवापराविरोधात कारवाई केली जाते. त्याप्रमाणे धारावतील महात्मा गांधी मार्गावरील सोशलनगरातील एका सर्किट बॉक्सची पाहणी करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गेले होते. त्यांनी तपासणी केली असताना एक वायर वीजमीटरमध्ये न जाता सर्किट बॉक्सच्या बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले. ही वायर जवळच्याच झोपडीच्या छतावरून पुढे गेल्याचे समोर आले. या वायरला अन्य आकार, रंगाच्या वायरची जोड देण्यात आली. या वायर इथल्या १४ घरांमध्ये गेल्या होत्या. त्यांवर घरांतील शिलाई मशिन, पंखे, टीव्ही, कूलर, फ्रीज, पंखे, वॉशिंग मशिन आदी वेगवेगळे वापर सुरू असल्याचे आढळले. या बेकायदा वीजजोडणीचा पंचनामा करून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात